४० च्या दशकातील कथानक असलेला कलंक या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट आणि भव्यदिव्य सेट यांचा भरणा करण्यात आला आहे. कलंकमधील प्रत्येक भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला असून प्रत्येक कलाकार रॉयल लूकमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित अनेक वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्याप्रमाणेच या चित्रपटामध्ये माधुरी तिच्या नृत्याने अनेकांना घायाळ करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्यात माधुरी आणि आलिया यांनी सुंदर नृत्यकौशल सादर केलं होतं. या गाण्यानंतर आता कलंकमधील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
कलंकमधील बाकी ‘सब फर्स्ट क्लास है’ हे गाणं प्रदर्शित झालं असून हे गाणं अभिनेता वरुण धवनवर चित्रित करण्यात आलं आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणीने स्क्रीन शेअर केली आहे. अमिताभ भट्टाचार्य यांचे लिरिक्स असलेल्या या गाण्याला प्रीमत यांचं संगीत दिग्दर्शन लाभलं आहे.
या चित्रपटात वरुणने जफर ही व्यक्तीरेखा साकारली असून गाणं प्रदर्शित झाल्यानंत वरुणनेही हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं.
#firstclass out today at 2 get ready #kalank pic.twitter.com/8eQzfxJdqu
— Varun ZAFAR Dhawan (@Varun_dvn) March 22, 2019
अभिषेक वर्मा दिग्दर्शित ‘कलंक’ हा चित्रपट २०१९ या वर्षातला बिग बजेट चित्रपट असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर ही स्टारमंडळी झळकणार आहे. यामध्ये वरुणने जफर ही व्यक्तिरेखा साकारली असून त्याचा चित्रपटातील लूक समोर आला आहे.