बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित प्रदीर्घ काळानंतर चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली असून ती आगामी ‘कलंक’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. मात्र ‘कलंक’च चित्रीकरण सुरु असतानाच चित्रपटाचा सेट कोसळल्यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण १५ दिवस पुढे ढकलण्यात आलं आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंधेरीतील चित्रकूट ग्राऊंटवर ‘कलंक’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना झालेल्या जोरदार पावसामुळे चित्रपटाचा सेट कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून सेटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरण १५ दिवस पुढे ढकलण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या काही भागांचं चित्रीकरण पूर्ण झालं असून तिसऱ्या टप्प्यातील चित्रीकरण सुरु असताना हा अपघात झाला आहे. हा सेट अमृता महल यांनी डिझाइन केला असून त्याची पुनर्निर्मिती करण्यासाठी बराच काळ लागणार आहे.

दरम्यान, हा चित्रपट पुढील वर्षी १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त हे स्टारकास्ट झळकून येणार आहेत. विशेष म्हणजे ब-याच काळानंतर माधुरी आणि संजय दत्त एकत्र काम करणार असल्यामुळे या दोघांची चित्रपटातील केमिस्टी पहायला चाहते उत्सुक असल्याचं दिसून येतं.