Kalki 2898 AD Box Office Collection Day 1: प्रभास, अमिताभ बच्चन व दीपिका पादुकोण स्टारर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी (२७ जून रोजी) हा सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग करून अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले. दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घसरण झाली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

‘सॅकनिल्क’ च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘कल्की 2898 एडी’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ९५ कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली. यापैकी तेलुगूमध्ये ६४.५ कोटी रुपये, हिंदी भाषेत २४ कोटी, मल्याळम २.२ कोटी, तमिळ चार कोटी आणि कन्नड भाषेत ३० लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल १९१.५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये चांगली कमाई केली होती, त्यामुळे पहिल्या दिवशी दमदार कलेक्शन झालं.

Kalki 2898 AD ची जबरदस्त ओपनिंग! प्रभासच्या सिनेमाने मोडले त्याचेच रेकॉर्ड्स, पहिल्या दिवशी कमावले तब्बल…

‘कल्की 2898 एडी’ दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

नाग अश्विन लिखित व दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ हा सायन्स फिक्शन चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या चित्रपटातील दमदार स्टारकास्ट, अनोखे सेट, व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्सने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘कल्की 2928 एडी’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर गाजवलं आहे.

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

‘सॅकनिल्क’ च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘कल्की 2928 एडी’ ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी देशभरात ५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तेलुगूमध्ये २५.६५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी तामिळमध्ये ३.५ कोटींची कमाई केली. हिंदीत चित्रपटाने २२.५ कोटी, मल्याळममध्ये दोन कोटी तर कन्नड चित्रपटाने ३५ लाखांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने जगभरात किती कमाई केली ते आकडे समोर आलेले नाहीत. दोन दिवसांत फक्त भारतात या चित्रपटाने १४९.३ कोटी कमावले आहेत.

अभिनेत्री रेशम टिपणीसची मुलं काय काम करतात? अभिनेत्री म्हणाली, “मुलगा ग्राफिक्स डिझायनर, तर मुलगी…”

दुसऱ्या दिवशी ‘या’ चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड्स

‘कल्की 2928 एडी’ ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ५४ कोटी कमावत ‘केजीफ २’ (४६.७९ कोटी), ‘जवान’ (४६.२३ कोटी), ‘गदर २’ (४३.८ कोटी), ‘बाहुबली २’ (४०.५ कोटी) आणि ‘फायटर’ (३९.५ कोटी) या चित्रपटांना दुसऱ्या दिवसांच्या कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकलं आहे.