Kalki 2898 AD Box Office Collection Day 4: ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळत आहे. चार दिवसांत या चित्रपटाने जबरदस्त कमाई करत अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. प्रभास, अमिताभ बच्चन व दीपिका पादुकोण यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका असल्या तरी यामध्ये दाक्षिणात्य कलाकारांची मांदियाळी आहे.

प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होता. टीझर व ट्रेलर आल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक तो बघण्यासाठी सिनेमागृहांमध्ये गर्दी करत आहेत. परिणामी चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत ३०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाने रविवारी आधीच्या दोन दिवसांच्या तुलनेत खूप जास्त कमाई केली आहे.

सिनेमा फ्लॉप झाल्याने बुडाले पैसे, बॉलीवूड अभिनेता कोट्यवधींचं कर्ज फेडण्यासाठी सर्कसमध्ये…

‘कल्की 2898 एडी’ ची कमाई

‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, ‘कल्की 2898 एडी’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ९५ कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली. यापैकी तेलुगूमध्ये ६४.५ कोटी रुपये, हिंदी भाषेत २४ कोटी, मल्याळम २.२ कोटी, तमिळ चार कोटी आणि कन्नड भाषेत ३० लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल १९१.५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये चांगली कमाई केली होती, त्यामुळे पहिल्या दिवशी दमदार कलेक्शन झालं.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

‘कल्की 2928 एडी’ ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी देशभरात ५४ कोटी रुपये कमावले. तेलुगूमध्ये २५.६५ कोटी, तमिळमध्ये ३.५ कोटी, हिंदी २२.५ कोटी, मल्याळम दोन कोटी तर कन्नड चित्रपटाने ३५ लाखांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने देशभरात ६४.५ कोटी रुपये कमावले.

एकेकाळी अफेअरच्या चर्चा, आता मनीषा कोईरालाबद्दल विचारताच नाना पाटेकर म्हणाले, “तिचा फोन नंबर…”

‘कल्की 2898 एडी’ चौथ्या दिवसाची कमाई किती?

या चित्रपटाने रविवारी म्हणजेच चौथ्या दिवशी ८४ कोटी रुपये कमावले. हिंदीमध्ये ३९ कोटी, तेलुगूमध्ये ३६.८ कोटी, तमिळ ५.५ कोटी, मल्याळम ३ कोटी व कन्नडमध्ये या चित्रपटाने ७० लाख रुपये कमावले. या चित्रपटाने चार दिवसांत फक्त भारतात ३०२.४ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत जगभरात ४१५ कोटी कमावले होते, आता चार दिवसांत जगभरात ५५० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.