Arshad Warsi Joker Comment on Prabhas: ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात दक्षिणेतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास जोकरसारखा वाटतोय असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीने केलं होतं, त्यावर ‘कल्की 2898 एडी’चा दिग्दर्शक नाग अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.
अर्शद वारसीने हा चित्रपट अजिबात आवडला नाही, असं मत मांडलं होतं. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या कामाचं त्याने कौतुक केलं होतं, तर प्रभासच्या भूमिकेबद्दल टीका केली होती. त्यानंतर दक्षिणेतील अनेक कलाकार अर्शदच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. आता चित्रपटाच्या दिग्दर्शकानेच यावर अर्शदला उत्तर दिलं आहे.
प्रभास ‘कल्की 2898 एडी’मध्ये जोकर वाटत होता, अर्शद वारसीचं स्पष्ट मत
काय म्हणाला होता अर्शद वारसी?
“मी कल्की पाहिला, मला चित्रपट अजिबात आवडला नाही. अमित जींनी अप्रतिम काम केलं आहे. मी शपथ घेऊन सांगतो की त्यांच्याकडे असलेली शक्ती थोडी आपल्याला मिळाली तर आपलं आयुष्य सेट होईल. त्यांचं काम अप्रतिम आहेत,” असं अर्शद समदिश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.
प्रभासच्या भूमिकेबद्दल अर्शद म्हणाला, “प्रभासला पाहून मला खरोखर खूप वाईट वाटलं. तो काय होता? तो एखाद्या जोकरसारखा वाटत होता. का? मला मॅड मॅक्स बघायचा आहे. मला मेल गिब्सनला तिथं बघायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं, का करता असं? मला खरंच कळत नाही.”
‘कल्की 2898 एडी’चा दिग्दर्शक काय म्हणाला?
‘कल्की 2898 एडी’ चा दिग्दर्शक नाग अश्विनने सोशल मीडिया पोस्टमध्ये अर्शदच्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. “परत मागे नको जायला. आता उत्तर-दक्षिण किंवा बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असं नाही, आपण याकडे व्यापक नजरेने बघायला हवं. युनायटेड इंडियन फिल्म इंडस्ट्री. अर्शद साहेबांनी थोडे चांगले शब्द निवडायला पाहिजे होते. पण ठीक आहे, मी त्यांच्या मुलांसाठी खेळणी पाठवत आहे. तसेच मी प्रभासला ‘कल्की 2898 एडी’मध्ये सर्वोत्तम दाखवण्यासाठी कठोर मेहनत घेईन,” असं नाग अश्विनने एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे.
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने जगभरात १०४२ कोटी रुपयांहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. त्यापैकी ७६७ कोटी या चित्रपटाने फक्त भारतात कमावले आहेत. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर हा आता चित्रपट नेटफ्लिक्स व प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे.