उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील फरार असलेला आरोपी असद अहमद आणि शूटर गुलाम मोहम्मदला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठार केलं आहे. असद हा गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा आहे. झाशीतल्या बडागाव येथील परीछा डॅमजवळ एसटीएफने गुरुवारी असद आणि गुलामचा एन्काउंटर केला. या एन्काउंटरनंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने म्हटलंय, “माझ्या भावासारखं कुणीच नाही,” या ट्वीटमध्ये तिने योगी आदित्यनाथ यांना टॅग केलं आहे. तसेच इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर करून योगी आदित्यनात आणि उत्तर प्रदेश पोलिसांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, आता यावर बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट विश्लेषक कमाल आर खान याने देखील या एन्काउंटरवर प्रतिक्रिया दिली आहे. कमालने एक ट्वीट केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, अतिक आणि त्याच्या मुलाचा अंत इतर गुन्हेगारांसारखाच होता! जसं कराल तसं भराल. परंतु कायद्याची प्रतिष्ठा प्रत्येकाने राखली पाहिजे! कारण हा हिंदुस्थान आहे अफगाणिस्तान नाही!

हे ही वाचा >> “सकाळी सीरियल किलर…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला आशिष शेलारांचं उत्तर, म्हणाले, “देशातल्या लोकशाहीमुळेच तुम्ही…”

पोलीस एन्काउंटरमध्ये असद अहमद ठार

असद आणि गुलाम या दोघांनी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची हत्या केली आणि दोघेही फरार झाले. एसटीएफचं विशेष पथक सातत्याने या दोन्ही आरोपींचा शोध घेत होतं. दोन्ही फरार गुन्हेगार झाशी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एका एन्काउंटरमध्ये त्यांना ठार केलं. उत्तर प्रदेश गेल्या ४९ दिवसांपासून दोघांचाही शोध घेत होते. महत्त्वाचं म्हणजे दोघांवरही प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांकडे परदेशी शस्त्रं सापडली आहेत.

Story img Loader