बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो त्याच मत मांडताना दिसतो. यावेळी केआरकेने अभिनेता अभिषेक बच्चनशी पंगा घेतला आहे. पण अभिषेकने केआरकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिषेकचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरतरं अभिषेकने एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्याने ‘वाशी’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. पोस्टर शेअर करत अभिषेकने मल्याळम चित्रपटसृष्टीची स्तुती केली आहे. पोस्टर शेअर करत “हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक अप्रतिम चित्रपट आहे.” त्यासोबत अभिषेकने संपूर्ण चित्रपटाच्या कास्टला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

आता या ट्वीटवर केआरकेने बॉलिवूडवर निशाना साधला आहे. अभिषेकच्या ट्वीटला रिट्वीट करत केआरके म्हणाला, “भाऊ, तुम्ही बॉलिवूडचे लोक सुद्धा कधी अप्रतिम चित्रपट बनवा.” यासोबत केआरकेने हात जोडण्याचे इमोटीकॉन वापरले आहे. केआरकेचे ट्वीट पाहताच त्याला सडेतोड उत्तर देत अभिषेक म्हणाला, “प्रयत्न करू. तुम्ही बनवला होता ना… देशद्रोही.”

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

पुढे आणखी एक ट्वीट केआरके म्हणाला, “हाहाहा! माझ्या चित्रपटाचं बजेट हे १ कोटी ५० लाख रुपये असतं तर, तुमच्या मेकअप मॅनचं बजेट हे त्याहून जास्त असतं. बॉलिवूडमधील लोकांनी दुसरा चित्रपट बनवू दिला असता तर ब्लॉकबस्टर चित्रपट बनवून दाखवला असता.” यावर पुन्हा एकदा अभिषेक केआरकेला म्हणाला, “चला, तुम्ही पण प्रयत्न करा. आशा आहे की या संघर्षात तुम्ही यशस्वी व्हाल.” यावर केआरके उत्तर देत म्हणाला, “मी शांत बसलो आहे कारण मला माहित आहे बॉलिवूड माफीया मला काही करू देणार नाही.” त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

केआरकेचा ‘देशद्रोही’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याच केआरकेसोबत ग्रेसी सिंग, हर्षिता भट्ट, रंजीत, यशपाल शर्मा हे मुख्य भूमिकेत होते.

आणखी वाचा : Email Vs Female म्हणतं रितेशने शेअर केला जिनिलासोबतचा मजेशीर व्हिडीओ

दरम्यान, अभिषेकने ज्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. त्या चित्रपटाचं नाव ‘वाशी’ आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु झाली असती. या चित्रपटात Tovino आणि कीर्ति सुरेश वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamaal r khan troll abhishek bachchan for praising malayalam film vaashi but abhishek remember him about deshdrohi dcp