वादग्रस्त ट्विट्स आणि वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या कमाल आर खानचं अधिकृत ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. विविध विषयांवर कोणीही विचारलेलं नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मतं मांडतो. त्याचं ट्विटर अकाऊंट बंद करण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध बॉलिवूड चित्रपटांवर केआरके ट्विटरद्वारे त्याचं समीक्षण मांडतो. आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचंही समीक्षण ट्विटरवर लिहिलं. या चित्रपटाची प्रशंसा अनेकांकडून होत असताना केआरकेने मात्र चित्रपट वाईट असल्याचे म्हटले. यानंतरच त्याचं ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचं म्हटलं जात आहे. केआरकेने फेसबुक अकाऊंटवरून त्याचा राग व्यक्त केला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, ‘ट्विटर अकाऊंटसाठी बरीच मेहनत घेतल्यानंतर ६० लाख फॉलोअर्स मला मिळाले होते. कदाचित आमिर खानच ट्विटरचा मालक असावा, म्हणूनच इतक्या सहज पद्धतीने माझं ट्विटर अकाऊंट बंद केलं गेलं. माझी वेबसाइट आणि युट्यूब चॅनलसुद्धा आहे, जिथे मी चित्रपटांविषयी माझं मत मांडत राहिन.’

ट्विटरच्या माध्यमातून केआरकेने बऱ्याच कलाकारांवर टीकासुद्धा केली होती. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या हृतिक-कंगना वादामध्येही त्याने उडी घेत कंगनाच्या बहिणीवर निशाणा साधला होता. त्याचं अकाऊंट बंद केल्यानंतर अनेक ट्विटरकरांनी आनंद व्यक्त केला आहे. ही तर दिवाळीची उत्तम भेट, असंदेखील काहींनी म्हटलं आहे.