१९९६ सालचा ‘इंडियन’ हा तमिळ चित्रपट सुपरहिट ठरला होता. कमल हासन अभिनीत आणि एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. यात कमल हासनने सेनापती आणि त्याचा मुलगा चंद्रू अशा दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील एक सैनिक भष्ट्राचाराविरोधात लढाईला उभा राहतो. त्याच्या या प्रवासात त्याला आलेल्या अडचणी, त्याचा संघर्ष इंडियन चित्रपटामध्ये दाखवला आहे. शेवटच्या सीनपर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वल ‘इंडियन २’ येणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी ७ नोव्हेंबर २०१८ रोजी कमल हासनच्या ६४ व्या वाढदिवसच्या निमित्ताने केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेव्हापासूनच या चित्रपटाची लोक उत्सुकतेने वाट बघत होते. मध्यंतरी या चित्रपटाच्या चित्रीकरणात बऱ्याच अडचणी आल्या, कोविडसारख्या माहमारीमुळे काही महीने चित्रीकरण थांबवण्यातही आले. पण अखेर हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर प्रदर्शित केले आहे.

आणखी वाचा : अर्जुन कपूर व भूमी पेडणेकरची सिझलिंग केमिस्ट्री, जबरदस्त सस्पेन्स अन्… ‘द लेडीकिलर’चा ट्रेलर प्रदर्शित

या पोस्टरवर या चित्रपटाची झलक लवकरच पाहायला मिळणार असंही नमूद केलं गेलं आहे. ‘इंडियन २’ ची पहिली ३ नोव्हेंबर २०२३ रोजी दाखवण्यात येणार आहे. मात्र हा या चित्रपटाचा टीझर असेल की ट्रेलर हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लायका प्रॉडक्शनने या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. उदयनिधी स्टॅलिन आणि ए सुबास्करन यांनी ‘इंडियन २’ची निर्मिती केली आहे. तसेच या चित्रपटात कमल हासन यांच्यासह रकुल प्रीत सिंग, काजल अग्रवाल, सिद्धार्थ, प्रिया भवानी शंकर, गुलशन ग्रोव्हरसारखे बरेच स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘जवान’ व ‘लिओ’सारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या अनिरुद्ध रवीचंदरनेच या चित्रपटाचं संगीत दिलं आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली नसली तरी तब्बल २७ वर्षांनी येणारा ‘इंडियन २’ बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार हे नक्की आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan and shakars indian 2 poster out first intro release date out now avn