प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘पीके’च्या तमिळ रिमेकमध्ये अभिनेता कमल हसन दिसणार आहे. ‘जेमिनी फिल्म्स् सर्किट’ या चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे समजते. या आधी जेमिनीने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांचा अनुक्रमे ‘वसूल भाई एमबीबीएस’ आणि ‘ननबन’ नावाने रिमेक बनवला होता. ‘पीके’च्या रिमेकमध्ये कमल हसन मुख्य भूमिका साकारणार असल्याचे समजते. ते स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा करणार असल्याचे बोलले जात आहे. राजू हिरानींच्या ‘पीके’ चित्रपटाने कोट्यवधींचे रेकॉर्ड मोडीत काढत, नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. मूळ ‘पीके’ चित्रपटात आमीर खान आणि अनुष्का शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader