भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतातील कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन पुकारले आहे. गेल्या महिनाभरापासून ऊन-पावसाची तमा न बाळगता शांततेत आपल्या मागण्यांसाठी धरणे पुकारले आहे. परंतु त्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडून अद्यापही लक्ष दिले जात नसल्याने हा वाद आणखी चिघळत चालला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावर बऱ्याच राजकीय संघटनांनी मौन धारण केलं आहे तर फार कमी सेलिब्रिटीजनी यावर भाष्य केलं आहे. या काही सेलिब्रिटीजमध्ये आता तामिळ अभिनेते कमल हासन यांचं नावही पुढे आलं आहे. नुकतंच कमल हासन यांनी या एकूण प्रकारांवर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ एक ट्वीट केलं आहे. कालच या आंदोलनाला बरोबर एक महिना पूर्ण झाला. त्या निमित्ताने ट्वीट करत कमल हासन यांनी त्यांचे विचार मांडले.

आणखी वाचा : बहुप्रतीक्षित वेब सीरिज ‘असुर सीझन २’ बद्दल मोठी अपडेट; ‘या’ महिन्यात ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

कमल हासन आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, “आज कुस्तीपटूंच्या आंदोलनाला बरोबर एक महिना झाला. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लढण्याऐवजी आपण त्यांना त्यांच्याच खासगी सुरक्षेसाठी लढायला भाग पाडत आहोत. माझ्या प्रिय भारतीय जनतेला एकच सवाल आहे, आपण कोणाला महत्त्व देणं सध्या आवश्यक आहे, आपले खेळाडू की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी?”

कमल हासन यांच्या कित्येक चाहत्यांनी त्यांच्या या ट्वीटचे कौतुक केले आहे. आत्तापर्यंत पूजा भट्ट, स्वरा भास्कर, सोनू सूद, विद्युत जामवाल यांनी या प्रकरणावर भाष्य करत कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कमल हासन हे सध्या ‘इंडियन २’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.