Indian 2 Intro: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन सध्या त्यांच्या आगामी ‘इंडियन २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. गेली बरीच वर्षं प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते. हीच प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेता चित्रपट निर्मात्यांनी आज ‘इंडियन २’ या चित्रपटाचा इंट्रो व्हिडिओ प्रदर्शित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या इंट्रो व्हिडीओची सिनेप्रेमी आतुरतेने वाट बघत होते. वेगवेगळ्या भाषेतील हा इंट्रो व्हिडीओ त्या त्या भाषेतील बड्या सेलिब्रिटीने शेअर केला आहे. तमिळमध्ये हा इंट्रो सुपरस्टार रजनीकांत यांनी सादर केला, तर तेलुगू भाषेतील व्हिडीओ एसएस राजामौली यांनी सादर केला, मल्याळम भाषेतील व्हिडीओ मोहनलाल यांनी तर हिंदीमधील व्हिडीओ आमिर खानने सादर केला. हिंदीत या चित्रपटाचे नाव ‘हिंदुस्तानी २’ आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Pushpa 2 News Marathi
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ मधल्या ‘या’ आडनावावरुन करणी सेना आक्रमक, निर्मात्यांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारा
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”

आणखी वाचा : अखेर प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी पाहायला मिळणार कमल हासन यांच्या ‘इंडियन २’ची पहिली झलक, २७ वर्षांनी येतोय सिक्वल

‘इंडियन २’ च्या टीझरच्या सुरुवातीलाच कमल हासन यांचा जबरदस्त देशभक्तीपर संवाद आपल्या कानावर पडताना दिसतो. कमल हसन ‘इंडियन’ चित्रपटाच्या माध्यमातून २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा भ्रष्टाचार मूळापासून नष्ट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्रपटाचा टीझर पाहून स्पष्ट होत आहे. याबरोबरच या इंट्रोमध्ये व्हीएफएक्सचाही उत्तम वापर करण्यात आला आहे.

या इंट्रोमध्ये कमल हासन यांचा लुक प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे. यात कमल हासन यांच्यासह सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, काजल अग्रवाल, प्रिया भवानी शंकर यांचीही झलक पाहायला मिळत आहे. एस. शंकर यांच्या ‘इंडियन २’मध्ये पुन्हा कमल हासन सेनापती आणि चंद्रू या दुहेरी भूमिका निभावणार आहेत. चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नसला तरी हा २०२४ चा बहूप्रतीक्षित अन् बहुचर्चित चित्रपट ठरणार हे नक्की.

Story img Loader