अभिनेता केआरके म्हणजेच कमाल राशिद खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. केआरके ट्विटच्या माध्यमातून बॉलिवूडवर टीका करत असतो. त्याने स्वत:चे एक यूट्युब चॅनलसुद्धा सुरू केले असून त्यावर तो चित्रपटांचे समीक्षण करत त्याचे व्हिडीओ पोस्ट करत होता. अशातच काही दिवसांपूर्वी तो वादग्रस्त ट्विट्समुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आणि त्याला तुरुंगात जावं लागलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बल ९ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर कमाल राशिद खान उर्फ ​​केआरकेची जामिनावर सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आलेल्या केआरकेने ट्विटरवर पहिली पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्याने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराचा बदला घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. कमाल खानने ट्विटरवर संतप्त इमोजीसह “मी बदला घेण्यासाठी परतलो आहे,” असं लिहिलंय.

कमाल खानने ट्विटरवर संतप्त इमोजीसह “मी बदला घेण्यासाठी परतलो आहे,” असं लिहिलंय.

केआरकेने २०२० मध्ये निधन झालेल्या इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्गज कलाकारांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी अटक केली होती. मुंबई पोलिसांनी केआरकेला विमानतळावर अटक केली आणि दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले होते. त्या वादग्रस्त ट्विट्समुळे त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याचदरम्यान त्याच्या विरोधात तीन वर्षांपूर्वीच्या खटल्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता एका नवोदित अभिनेत्रीने त्याच्यावर छेडछाड केल्याचा दावा केल्याने वर्सोवा पोलिसांनी केआरकेला पुन्हा अटक केली होती. या दोन्ही प्रकरणात तुरुंगात राहिल्यानंतर आता केआरकेची जामिनावर सुटका झाली आहे आणि त्याने आपण बदला घेणार असल्याचा इशारा ट्वीट करून दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal r khan got bail tweets i am back for my vengeance hrc