काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. आता त्यांच्या पाठोपाठ ‘बेखुदी’ चित्रपटात काम केलेला अभिनेता कमल सदाना आणि लीजा जॉन यांनी देखील घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच कमल सदानाने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने घटस्फोट घेत असल्याचे सांगितले आहे. सध्या कमल आणि लीला हे वेगळे राहात आहेत. कमल मुंबईत राहात आहे तर लीजा तिच्या आई-वडिलांकडे गोव्यात राहात आहे. २१ वर्षांपूर्वी १ जानेवारी २००० रोजी कमल आणि लीजा यांनी लग्न केले होते. त्यांना एक मुलगा अंगद आणि मुलगी लीया आहे.

आणखी वाचा : ‘छोट्या कंगना’चा सोशल मीडियावर जलवा; कंगना रणौतलाही घातली भूरळ

गेल्या काही दिवसांपासून कमल आणि लीजा यांच्यामध्ये वाद सुरु होता. या विषयी बोलताना कमल म्हणाला, ‘दोन व्यक्तींमध्ये वाद सुरु झाले की ते शांतपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतात. आजकाल अशा गोष्टी होतच असतात. आम्ही पण त्यांच्यामधील एक आहोत.’

कमल सदाना लोकप्रिय चित्रपट निर्माते ब्रिज सदाना आणि अभिनेत्री सईदा खान यांचा मुलगा आहे. कमलने अभिनेत्री काजोलच्या ‘बेखुदी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘रंग’ हा त्याचा चित्रपट हिट ठरला होता.