हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबी ही तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे किंवा तिच्या विधानांमुळे कायम चर्चेत असते. अलीकडेच काम्याने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, यावेळी तिला ओटीटीमध्ये केव्हा काम करणार या माध्यमापासून तू स्वत:ला दूर का ठेवले आहेस? असा प्रश्न विचारण्यात आला यावर काम्याने आपले मत मांडत काही बॉलीवूड स्टार्सवर टीका केली आहे.

हेही वाचा : २२ वर्षांनी पुन्हा रिलीज होणार ‘गदर’; निर्मात्यांनी केली खास ऑफरची घोषणा, तिकीट असणार फक्त…

Pavitra Puniya on Mamta Kulkarni being expelled from Kinnar Akhara
प्रसिद्ध अभिनेत्रीची किन्नर आखाड्यातून ममता कुलकर्णीची हकालपट्टी झाल्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Komal More
“शत्रूला पोत्यात भरून…”, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तेजूच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…
laxmichya paulanni apurva sapkal exit from show
ध्रुव दातार पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने सोडली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका! तिच्याऐवजी मालिकेत कोण झळकणार?
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
Mayuri Deshmukh
“तर ते अत्यंत धोकादायक…”, लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख सोशल मीडियाच्या वापराबाबत म्हणाली…

काम्या पंजाबी गेल्या दोन दशकांपासून विविध हिंदी मालिकांमध्ये काम करत आहे, परंतु अद्याप तिने कोणत्याही ओटीटी माध्यमावर काम केले नाही. याविषयी खुलासा करताना काम्या म्हणाली, “मला टेलिव्हिजनवर काम करायला जास्त आवडते. मला वाटते तुम्ही छोट्या पडद्यावर काम करत असाल किंवा मोठ्या पडद्यावर प्रत्येक अभिनेता हा अभिनेता असतो. आजकाल मोठ-मोठे कलाकार सुद्धा त्यांच्या वेबसीरिजचे प्रमोशन करण्यासाठी टीव्ही शोमध्ये येतात.”

हेही वाचा : फोटोतील ‘या’ लहान मुलीला ओळखलंत का? आज आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

काम्या पंजाबीने पुढे सांगितले, “टीव्ही, ओटीटी किंवा चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये फरक नसावा. ज्या कलाकारांना अभिनयसुद्धा करता येत नाही त्यांना मोठमोठे निर्माते कास्ट करतात ही अत्यंत दु:खद परिस्थिती आहे.”

हेही वाचा : ओम राऊत-क्रिती सेनॉनच्या किसिंग व्हिडीओमुळे नवा वाद; मंदिरातील पुजारी संतापले, म्हणाले “हॉटेलच्या खोलीत जाऊन…”

एका वेब सीरिजचे उदाहरण देताना काम्या म्हणाली, “ओटीटीवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांना अभिनयातील ‘अ’ देखील येत नाही. माफ करा… मी त्यांचे नाव घेणार नाही. नुकतीच मी एक सीरिज पाहत होते ज्यात एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या मुलीने पदार्पण केले आहे. पण, मी एकही एपिसोड नीट पाहिला नाही. त्या मुलीला अजिबात अभिनय करता येत नव्हता, परंतु यावर कोणीच काही बोलू शकत नाही, कारण ती एका मोठ्या स्टारची मुलगी आहे.”

काम्याने सोनाक्षीचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या तिच्यावर टीका केली आहे. कारण नुकतेच सोनाक्षी सिन्हाने ‘दहाड’ वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

Story img Loader