‘पुष्षा’, ‘केजीएफ’ सारख्या दाक्षिणात्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळतो हे आपण याआधीही अनुभवलं आहे. सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांनामागे टाकत कन्नड चित्रपट ‘कांतारा’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात २४३ कोटी रुपये कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांसह कलाक्षेत्रामधील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचं कौतुक केलं. ‘कांतारा’ला मिळालेलं यश पाहता रिषभच्या कामाचं दिग्गज अभिनेत्यांनी कौतुक केलं आहे.

रिषभ हा या चित्रपटाचा खऱ्या अर्थाने सर्वेसर्वा म्हणता येईल कारण लेखक, दिग्दर्शन, अभिनय अशा तीन गोष्टी त्याच्या खांद्यावर होत्या. नुकतीच त्याने पिंकव्हीलाला मुलखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने चित्रपटाबद्दल आणि सेटवरील गमंतीजमती सांगितल्या आहेत. तो असं म्हणाला ‘आम्ही जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले तेव्हा चित्रपटाच्या सेटवर अनेकजण घाबरत होते. आमच्या सेटवर वातावरणदेखील तसेच आहे. कांताराचा अनुभव अनेकांनी सेटवरच घेतला आहे. सुरवातीला सेटवरील काहीजण देवाला मानत नव्हते त्यांना देवावर विश्वास नव्हता मात्र चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ते लोक सेटच्या आसपास असणाऱ्या कोणत्याही मंदिरात जात होते आणि प्रार्थना करत होते, मंदिरातील प्रसाद घेऊनच सेटवर परतत होते. असे बदल सेटवर घडत होते. मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो कारण मी ज्या प्रकारच्या कुटुंबातून आलो आहे तिथे या गोष्टी मानल्या हातात.’

religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Shakambhari Navratri festival of Tuljabhavani Devi begins in dharashiv
आई राजा उदोऽऽ उदोऽऽच्या गजरात घटस्थापना, तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ

‘दिल तो पागल हैं’ : तब्बल चार अभिनेत्रींनी चित्रपट नाकारल्यानंतर अखेर करिष्मा कपूरने दिला होता होकार

रिषभने आपल्या करियरची सुरवात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आहे. रिषभने काही काळ बॉलिवूडमध्ये छोटी मोठी काम केली आहेत मात्र त्याला यश मिळाले नाही. रिषभने २००६ आलेल्या ‘सायनाईड’ या कन्नड चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ‘किरिक पार्टी’, ‘सा.हाय.प्रा.शाले कासारगोडू, कोडुगे: रामण्णा राय’ असे चित्रपट रिषभने दिग्दर्शित केले.

‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला कन्नड व मल्याळममध्ये प्रदर्शित झाला. तर १४ ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला.या चित्रपटाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजूनतरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Story img Loader