सर्वत्र सध्या कंगना फिव्हर दिसतोयं. याचाचं फायदा घेत निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘कट्टी-बट्टी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात कंगना राणावत आणि इमरान खानची प्रमुख भूमिका आहे.
चित्रपटात कंगणाचं पायलच्या तर इमरानने मॅडी या पात्राची भूमिका साकारली आहे. पायल आणि मॅडी पाच वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नंतर त्यांचा ब्रेक अप होतो यावर चित्रपटाची कथा आहे. कंगना आणि इमरानची जोडी पहिल्यांदाच या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एकत्र दिसेल. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता बिनधास्त आणि चुलबुली कंगना पुन्हा एकदा पाहावयास मिळेल. निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि यूटीव्ही मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला रोमॅण्टिक कॉमेडी ‘कट्टी बट्टी’ १८ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा