बॉलिवूडची क्वीन म्हणून अभिनेत्री कंगान रणौत ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताने दिसते. काही दिवसांपूर्वी कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरेक्षवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता कंगनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने कंगनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती प्लेटमधून पेस्ट्री घेते, तोंडा जवळ घेऊन जाते आणि परत त्या प्लेटमध्ये ठेवते. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन तिला अनेकांना ट्रोल केले आहे. पण हा व्हिडीओ कुठला आहे अद्याप समोर आलेले नाही.
PM Security Breach: ‘काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काही वाकडे करु शकत नाही’, राजू श्रीवास्तवची प्रतिक्रिया

एका यूजरने कमेंट करत ही तर करोना पसरवते असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘मस्तच, पहिले तिने हातात की पेस्ट्री घेतली, नंतर तिने श्वास घेतला आणि नंतर पुन्हा प्लेटमध्ये ठेवली. आता ती दुसरं कुणी तरी खाणार’ अशी कमेंट करत कंगनाला सुनावले आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘करोना काळात कंगनाचे असे वागणे चुकीचे आहे’ असे म्हटले आहे.

यापूर्वी कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरुन पंजाब दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत असल्याचे म्हटले होते. ‘पंजाबमध्ये जे घडलं ते लज्जास्पद आहे. आदरणीय पंतप्रधान हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नेते, प्रतिनिधी आणि १४० कोटी जनतेचा आवाज आहेत. त्यांच्यावर असा हल्ला म्हणजे देशातल्या प्रत्येक नागरिकावर हल्ला आहे, आपल्या लोकशाहीवरचा हल्ला आहे’ असं ती म्हणाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut after picking up the pastry gave pose and then put it back on plate netizens slam avb