बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना बिनधास्तपणे सोशल मीडियावर तिचं मत मांडताना दिसते. कंगनाने पुन्हा एकदा अभिनेत्री आलिया भट्ट कमेंट करत निशाना साधला आहे. कंगना आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर कमेंट करत म्हणाली, हा चित्रपट फ्लॉप होणार कारण यात मुख्य भूमिका साकरण्यासाठी चुकिच्या अभिनेत्रीला निवडले आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. आलियाचे नाव न घेता कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिला ‘पापा की परी’ म्हणत लिहिले, “या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा चुराडा होईल. पापा की परी (चित्रपट माफिया डॅडी) आणि (जिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे) कारण पापाला सिद्ध करायचे आहे की रोमकॉम बिम्बो अभिनय देखील करू शकते. या चित्रपटाचा सगळ्यात चुकीची गोष्ट म्हणजे कास्टिंग आहे. हे सुधारणार नाही. यामुळे चित्रपटगृह आता फक्त दाक्षिणात्य आणि हॉलिवूड चित्रपटांकडे वळत आहेत. जोपर्यंत चित्रपट माफिया सत्तेत आहेत तोपर्यंत बॉलीवूडच्या नशिबात हेच लिहिले आहे”, असे कंगना म्हणाली.
आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी
आणखी वाचा : “तुम्ही बनवला होता ना… देशद्रोही”, अभिषेक बच्चन आणि केआरकेमध्ये ट्विटर वॉर
कंगणा पुढे म्हणाली, “बॉलिवूड ‘माफिया डॅडी पापा जो’ एकट्याने चित्रपटसृष्टीची संस्कृती बदलली आहे. अनेक मोठ्या दिग्दर्शकांचे मानसिक खच्चीकरण केले आणि त्याला पाहिजे त्या कलाकारांना काम दिलं. या चित्रपटानंतर आणखी एक उदाहरण समोर येईल. लोकांनी ते पाहणं बंद करायला हवे. या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता देखील याच्या खच्चीकरणाचा बळी गेले आहेत.”
आणखी वाचा : Email Vs Female म्हणतं रितेशने शेअर केला जिनिलासोबतचा मजेशीर व्हिडीओ
दरम्यान, ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. तर या चित्रपटात माफिया क्वीन्स ऑफ ऑफ मुंबई या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगुबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अजय देवगणही तिच्यासोबत दिसणार आहे.