बॉलिवूडची क्वीन कंगना अभिनयानंतर दिग्दर्शनाकडे वळली आहे. तिनं दिग्दर्शित केलेला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलल्यानंतर आता ती आणखी एका चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सज्ज झाली आहे. ती के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे.

या संबधीची चर्चा अजूनही पहिल्या टप्प्यात आहे. कंगना यासाठी अमेरिकेतून दिग्दर्शनाचे धडेही घेत असल्याचं समजत आहे. विजयेंद्र प्रसाद यांनी बाहुबली आणि मख्खी सारख्या चित्रपटासाठी काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास कंगनाही खूपच उत्सुक आहे. ही प्रेमकथा इतर प्रेमकथेपेक्षा वेगळी असणार आहे हे नक्की.

कंगनाचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे कंगना दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्य पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत. ‘मणिकर्णिका’ सोबतच कंगनाचा ‘मेंटल है क्या’ हा चित्रपटही पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Story img Loader