नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौतचा धाकड चित्रपट मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. कंगनानं तिच्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत बरीच उत्सुकता होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये कंगना रणौत आतापर्यंत कधीच न दिसलेल्या धाकड अवतारात दिसत आहे.

‘धाकड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये कंगना रणौत ‘एजंट अग्नी’ची भूमिका साकारत आहे. जी एक प्रशिक्षित आणि आपल्या कामात अतिशय चोख असणारी एजंट आहे. ट्रेलरमध्ये कंगनाचा धाकड अवतार पाहायला मिळत आहे. तिचे या चित्रपटात बरेच अॅक्शन सीन आहेत. या चित्रपटासाठी कंगनानं ३ महिन्यांचं विशेष प्रशिक्षण घेतलं होतं.

या चित्रपटात अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत असून तो एक आंतरराष्ट्रीय ह्यूमन आणि आर्म ट्राफिकर आहे. १० वर्षांपासून रडारवर असलेल्या रुद्रवीरशी कंगना दोन हात करताना दिसणार आहे. कंगना रणौत आणि अर्जुन रामपाल यांच्यासोबतच या चित्रपटात दिव्या दत्ताचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट येत्या २० मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून कंगनाला बऱ्याच अपेक्षा आहेत.

Story img Loader