‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर असलेली बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत तिचा यंदाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहे. परखड मतं आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली कंगना दहा दिवसांचं मौनव्रत पाळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोइंबतूर इथल्या एका आश्रममध्ये कंगना दहा दिवस योग आणि ध्यानसाधना करणार असल्याचं समजतंय. येत्या २३ मार्च रोजी तिचा वाढदिवस आहे. दहा दिवसांच्या कॅम्पनंतर ती तिच्या घरी मनालीला जाणार आहे. मनालीत कुटुंबीयांसोबत ती तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. गेल्या वर्षीसुद्धा कंगनाने तिचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत वेळ घालवत साजरा केला होता. ३१वा वाढदिवस म्हणून तिने ३१ झाडंसुद्धा लावली होती.

याबद्दल ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, ‘मी १६-१७ वर्षांची असल्यापासून योगसाधना करते. कोइंबतूरमध्ये जो कोर्स होणार आहे ती थोडी पुढची पायरी आहे. तो कोर्स करण्याची माझी खूप इच्छा होती आणि नेमकं माझ्या वाढदिवसाच्या तारखांमध्ये ते जुळून आलं. दहा दिवस मौन पाळणं आव्हानात्मक असेल. पण ही मी स्वत:ला वाढदिवशी दिलेली अमूल्य भेट असेल.’

कंगनाचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे कंगनाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. चार आठवड्यात ‘मणिकर्णिका’ने १०० कोटींचा टप्पा गाठला होता.