सध्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभा, रॅलींचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर अनेक राजकारणी आणि त्यांच्या पक्षांना कलाकार देखील पाठिंबा देत आहेत. या सगळ्यात बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने यूपी विधानसभा निवडणुकीबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच गरिबांसाठी एक वक्तव्य केलं आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत कंगनाने देशाच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर तिचं मतं मांडत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिने पाठिंबा दिला आहे. ‘गरिबांचे स्वप्न पूर्ण झाले, लाखो लोकांना स्वतःचे घर मिळाले. तुमचे एक मत गरीब आणि गरजू लोकांचे प्राण वाचवू शकते कारण योगी जिंकतील, तर यूपी जिंकेल, असे कॅप्शन कंगनाने दिले आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात
कंगना सध्या ‘लॉक अप’ या तिच्या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. बुधवारी या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये कंगना ही त्या लॉक अपवर लक्ष ठेवणार असून तिचे नियम या लॉक अपमध्ये लागू असतील. कंगनाचा हा शो खूपच बोल्ड आणि वादग्रस्त असणार आहे, कारण यामध्ये सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून येणार आहेत.
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?
आणखी वाचा : पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित
‘लॉक अप’ मध्ये १६ विवादांमुळे चर्चेत असलेले सेलिब्रिटी असणार आहेत. हे ७२ दिवस या लॉक अपमध्ये राहतील. यावेळी त्यांना कोणतीही सुविधा दिली जाणार नाही. त्यांना अशा लोकांसोबत तिथे ठेवण्यात येणार आहे, ज्यांच्यासोबत ते एक मिनिटही राहू शकत नाही. तर शोमध्ये टिकून राहण्यासाठी सेलिब्रिटींना त्यांचे डार्क सिक्रेट्स संपूर्ण जगाला सांगावे लागतील. हा शो २७ फेब्रुवारी रोजी ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 24×7 लाइव्ह पाहता येणार आहे.