बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना रणौत सध्या लॉक अप या तिच्या शोमुळे चर्चेत आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा शो सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिला आहे. स्पर्धक पायल रोहतगीने नुकताच खुलासा केला की ती आई होऊ शकत नाही. तर या सगळ्यात शोमध्ये सुरु असलेल्या भांडणात शिवम सिंगने पायल रोहतगीच्या प्रेग्नेंसीविषयी भाष्य केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शोमध्ये पायलसोबत अंजली अरोरा आणि प्रिन्स नरुलाचे भांडण झाले. अंजलीने शिवम शर्माला सांगितले की पायलने शोचा माजी स्पर्धक करणवीर बोहरासोबत खोट्या अफेअरला पाठिंबा दिला होता. अंजली म्हणाली, “ती केवीसोबत अफेअर करायला तयार होती. ही सुपर न्यूज माझ्यापर्यंत पोहोचली आहे.”

आणखी वाचा : प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अक्षय कुमार…, सेलिब्रिटी ‘या’ साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये

अंजलीने केलेले हे आरोप खोटे आहेत असं म्हणतं पायल म्हणाली, “कितनी घटिया हो’. या भांडणातमध्येच प्रिन्स नरूला येतो आणि बोलतो, हे तेव्हा घडलं जेव्हा करणवीरने अंजलीला त्याच्यासोबत रिलेशनशिप असल्याचे खोटे नाटक करण्यास सांगितले होते. हे ऐकून पायल आणखीनच चिडते आणि बोलते, ‘तुझं खोटं बोलण्याची हिम्मत कशी झाली, मूर्ख माणूस. मी माझ्या आईची शपथ घेते, मी हे कधीच बोलले नाही. यानंतर पायल रागाने सगळ्यांना सांगते, ‘तुम्ही सगळे मरून जा.”

आणखी वाचा : आपल्या कर्माने श्रीमंत होतात ‘या’ ३ राशीचे लोक, शनिदेवाची त्यांच्यावर असते विशेष कृपा

हे ऐकल्यानंतर, प्रिन्स कॅमेऱ्यासमोर जातो आणि बोलतो, “तिला लाज वाटत नाही की आपण कोणाची तरी मुलं आहोत आणि ती आम्हाला सांगते की, तुम्ही मरून जा असा श्राप आम्हाला देते.” यानंतर शिवमने पायलला टार्गेट केले आणि म्हणाला, “तू दुसऱ्यांच्या मुलांना श्राप देत आहेस तर देव तुला मूल कसं देईल.”

आणखी वाचा : आई कुठे काय करते : यशला सोडून गौरी अमेरिकेला जाणार का?

पायलने केला होता खुलासा

शो जसजसा फिनालेकडे जात आहे, तसतसा शोमधील ड्रामा वाढत आहे. पायल रोहतगीने अलीकडेच खुलासा केला की ती आई होऊ शकत नाही आणि त्यामुळेच तिचा जोडीदार संग्राम सिंहसोबत काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असूनही ती लग्न करत नाहीय

Story img Loader