बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. बॉलिवूड आणि खासकरून घराणेशाही विरोधात आवाज उठवणाऱ्या कंगनाला कायमच सत्ताधारी पक्षाच्या हातातलं बाहुलं म्हणून ट्रोल केलं जातं. याबरोबरच कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. नुकताच तिचा धाकड चित्रपट प्रदर्शित झाला आणि चांगलाच आपटला. कंगना आता ‘इमर्जन्सि’ या नावाने श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर एक चरित्रपट करत आहे. या चित्रपटात ती स्वतः मुख्य भूमिकेत असून ती स्वतःच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. कंगनाच्या या चित्रपटातल्या लूकचं भरपूर कौतुक झालं आहे.

याबरोबरच कंगनाचा आणखी एक बहुचर्चित चित्रपट लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘तेजस’. मीडिया रिपोर्टनुसार कंगनाचा हा चित्रपट ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होऊ शकणार नसून थेट पुढल्या वर्षीच हा चित्रपट येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंगनाचा हा चित्रपट तेजस गिल या पायलटच्या जीवनावर बेतलेला आहे.

suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
Chhava controversy
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘छावा’ चित्रपटातली ती दृश्यं का कापली जाणार?
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…

प्रथम हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर अचानक याच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घेतले गेले. असं म्हंटलं जात आहे की चित्रपटाचं व्हीएफएक्सचं बरंच काम बाकी असल्याने हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित करणं कठीण आहे. अजूनही चित्रपटाचं बरंच काम बाकी असल्याने कोणतीही कमतरता न ठेवता हा चित्रपट उत्तम पद्धतीने समोर यावा हीच या चित्रपटाच्या निर्मात्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच ही तारीख पुढे ढकलल्याचं सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या कंपनीकडून केली जात आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सर्वेश मेवाडा यांच्या खांद्यावर आहे. मध्यंतरी हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण ही शक्यता खोटी असून चित्रपट हा थेट सिनेगृहातच प्रदर्शित होईल असं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : ज्युनिअर एनटीआरच्या उपस्थितीमुळे ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमला कोटींचं नुकसान; पोलिसांनी रद्द केला शो

‘धाकड’नंतर कंगना पुन्हा या चित्रपटात दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. कंगनाबरोबरच या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अंशूल चौहान हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच कंगनाच्या ‘इमर्जन्सि’ची सुद्धा चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर अनुपम खेर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदेसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. कंगनाच्या या दोन्ही चित्रपटांची तिचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader