अभिनेत्री कंगना रणौतचा शेवटचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र तिचा हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी रुपयांचा पल्ला देखील गाठला नाही. आता तिचा आगामी ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचं बोललं जातंय. कंगनाला मिळालेल्या अपयशानंतर ‘तेजस’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा – दाक्षिणात्य अभिनेत्यासमोर अक्षय कुमारही ठरला फ्लॉप, बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटाने मारली बाजी?

BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘धाकड’च्या अपयशानंतर ‘तेजस’ चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित न करण्याचं या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ठरवलं आहे. कंगनाच्या गेल्या काही चित्रपटांना मिळत असलेलं अपयश पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाचा काही भाग पुन्हा एकदा चित्रीत करण्यात येणार आहे.

आणखी वाचा – VIDEO : ऐश्वर्या व मुलगी आराध्यासमोर बेभान होऊन नाचला अभिषेक बच्चन, पत्नीलाही नवऱ्याचं कौतुक

अद्याप चित्रपट कधी प्रदर्शित होणार? तसेच कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होईल? याची घोषणा करण्यात आली नाही. पण आता ‘तेजस’ चित्रंपटाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने स्पष्टीकरण दिलं आहे. “या चित्रपटाचं चित्रीकरण अजूनही बाकी आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सगळं चित्रीकरण पूर्ण करण्यात येईल. तसेच ५ ऑक्टोबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. ” असं तेजसच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे.

सर्वेश मारवा दिग्दर्शित या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलाच्या अधिकारीची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. कंगनाने ‘धाकड’साठी केलेली मेहनत पूर्णपणे अपयशी ठरली. पण तिचे पुढील चित्रपट तरी बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी करणार का? हे पाहावं लागेल.

Story img Loader