‘रिव्हॉल्व्हर रानी’ या चित्रपटातील माझी भूमिका पाहिल्यानंतर कुणी माझ्याशी लग्न करण्याचे धाडस करणार नाही असे विनोदी वक्तव्य कंगना रणावतने केले आहे. क्वीनमधील साध्या, सरळ मुलीच्या भूमिकेनंतर कंगना आता रिव्हॉल्वर राणी चित्रपटात अलका सिंग ही अत्यंत बोल्ड व पुरुषी व्यक्तिरेखा साकारणार आहे.
जूहू येथे जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कंगनाने उपस्थितांशी संवाद साधताना चित्रपटातील भूमिकेबाबत सांगितले. यावेळी तिच्याबरोबर चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असलेला अभिनेता वीर दास, दिग्दर्शक साई कबीर, सहनिर्माता तिग्मांशू धुलिया उपस्थित होते.
चंबळ खो-यामध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानत अलकाची भूमिका आणि चित्रपटाचे चित्रीकरण करणे तर आव्हानात्मक होतेच शिवाय अलकाची अत्यंत बोल्ड, पुरुषांना बंदुकीच्या टोकावर नाचवणारी भूमिका समजून घेत ती साकारणेही खूप अवघड होते असे सांगत कंगनाने क्वीनच्या यशानंतर ‘रिव्हॉल्वर रानी’मधील ही भूमिकादेखील यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
‘अब मर्द को दर्द होगा’ या टॅगलाइनमागे अलकाचीच भूमिका असल्याचे सांगत तिचा पोशाख, तिचे आक्रमक व बिनधास्त वागणे पाहता प्रत्यक्ष आयुष्यात या भूमिकेनंतर माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय कुणाला घेता येणार नाही असे गमतीने २७ वर्षीय कंगनाने म्हणताच सगळे खळखळून हसले. साई कबीर यांचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्या माध्यमातून राजकारणावर ब्लॅक कॉमेडीद्वारे भाष्य केले असले तरी त्यात एक प्रेमकथाही दडली असल्याचे कबीर यांनी सांगितले. येत्या २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा