रिमा कागतीच्या आगामी चित्रपटातून कंगना राणावत बाहेर पडणार असल्याचे काही दिवसांपूर्वी ऐकीवात होते. आता खुद्द कंगनानेच आपण रिमाच्या ‘मि. चालू’ चित्रपटात काम करणार नसल्याचे सांगितले. लोकांना फसविणाऱ्या व्यक्तिवर आधारित रिमाचा हा चित्रपट सुरुवातीपासूनच समस्यांच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील प्रमुख अभिनेता सैफ अली खानदेखील काही महिन्यांपूर्वी चित्रपटातून बाहेर पडला असल्याने रिमाची चित्रपटातील प्रमुख जोडीसाठी कलाकारांची शोधाशोध सुरू आहे. प्रियांका चोप्रा आणि फवाद अफझल खानला संपर्क साधण्यात आल्याचे समजत असले, तरी अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ‘एक्सेल एन्टरटेंन्मेंट’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटातील अन्य भूमिकांसाठी रिचा चढ्ढा, पुजा भट्ट आणि सारा जेन डायस यांना करारबद्ध करण्यात आले आहे. योगायोगाने दिग्दर्शक सुजॉय घोषच्या ‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’या आगामी चित्रपटात कंगना राणावत आणि सैफ अली खान एकत्र काम करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा