कोणीही गॉडफादर नसताना अभिनेत्री कंगना रणौतने इंडस्ट्रीत स्वतःचे नाव निर्माण केले. अनेकदा ट्रोलिंगला तोंड देऊन किंवा वादाच्या भोवऱ्यात अडकून पण या अभिनेत्रीने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले. ‘क्वीन’, ‘मणिकर्णिका’ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पडणारी कंगना अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. कोणत्याही भूमिकेला संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणारी ही अभिनेत्री आगामी ‘पंगा’ चित्रपटासाठी जय्यत तयारी करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पंगा’ चित्रपटात कंगना राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी खेळाडूची भूमिका साकारत आहे. या भूमिकेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी कंगना मेहनत घेताना दिसतेय. या चित्रपटाचे शूटिंग करताना कंगनाला अनेक कबड्डी सामने खेळायचे होते. या सगळ्या शॉट्समध्ये कंगनाने खूप छान अभिनय केला आहे. तिच्या मेहनतीचे कौतुक म्हणून तिच्या टीमने तिला बक्षीस द्यायचे ठरवले. या भूमिकेसाठी कंगनाला आहाराची बरीच पथ्य पाळायची होती. या पथ्यांमधून तिला दिलासा देण्यासाठी तिच्या टीमने दाक्षिणात्य पद्धतीने बनवलेले जेवण तिला सरप्राइज म्हणून दिले. तिच्या टीमने एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये कंगना जेवणाचा आस्वाद घेताना दिसतेय.

कंगनाचा ‘पंगा’ हा चित्रपट एका कब्बडीपटूच्या जीवनावर आधारित आहे. अश्विनी अय्यर तिवारी यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. या चित्रपटात कंगनासह जस्सी गिल, रिचा चड्ढा, पंकज त्रिपाठी आणि नीना त्रिपाठी हे कलाकार देखील झळकणार आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut panga south indian meal gift