दाक्षिणात्य अभिनेता यश सध्या त्याच्या ‘केजीएफ चॅप्टर २’मुळे बराच चर्चेत आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांचाही चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनंही या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली असून दाक्षिणात्य सुपरस्टार यशसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
कंगना रणौत तिच्या बिझी शेड्युलमध्येही सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील आपली मतं मांडताना दिसते. एवढंच नाही तर अनेकदा ती नवीन प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दलही लिहिताना दिसते. आताही तिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ चॅप्टर २’ आपली प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिनं यशचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा- “जेव्हा मला कॅन्सरबद्दल समजलं…” संजय दत्तनं सांगितला हृदयद्रावक अनुभव
आपल्या पोस्टमध्ये कंगनानं अभिनेता यशची तुलना महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. एक फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये कंगनानं लिहिलं, ‘यश अँग्री यंग मॅन आहे. ज्याची आपला देश मागच्या काही दशकांपासून वाट पाहत होता. जी ७० च्या दशकात अमिताभ बच्चन यांच्यानंतर कोणीच घेतली नव्हती.’ कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होताना दिसत आहे.