मे २०२१ मध्ये कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. ट्विटर कंपनीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याने तिच्यावर ही कारवाई झाली होती. काही वर्षांपासून ती या माध्यमावर फार सक्रिय होती. ट्विटरद्वारे ती वेगवेगळ्या विषयांवर सतत व्यक्त व्हायची. कंपनीद्वारे अकाऊंटवर निर्बंध आल्यामुळे तिने अन्य सोशल मीडिया साईट्सचा आधार घेतला. दरम्यान काल घडलेल्या एका घटनेमुळे कंगनाला तिचे अकाऊंट पुन्हा मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकन उद्योजक एलॉन मस्कने काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे शेअर्स विकत घेतले. काल त्याचा हा करार पूर्ण झाला आणि त्याच्याकडे कंपनीची मालकी आली. मालकी हक्क मिळाल्यानंतर एलॉनने सीईओ पराग अग्रवाल यांच्यासमेत अन्य काही अधिकाऱ्यांना पदावरुन काढून टाकले. त्याने भविष्यामध्ये अजून लोकांची कंपनीमधून हकालपट्टी होऊ शकते असेही म्हटले आहे. दरम्यान कंगना रणौतने त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आणखी वाचा – ‘कांतारा’ फेम अभिनेता रजनीकांत यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला अन्…, रिषभ शेट्टी व थलावया भेटीचा फोटो व्हायरल

कंगनाने या संबंधित काही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्या आहेत. यातल्या पहिल्या स्टोरीमध्ये ” मी सकाळपासून ट्रेंडमध्ये आहे. ट्विटरच्या प्रमुखांच्या सर्वनाशाची माझी भविष्यवाणी खरी ठरली आहे”, असे लिहिलेले आहे. तेथे तिचा फोटो आणि ट्विटरच्या ट्रेंडींग सेक्शनचा स्क्रीनशॉट लावलेला आहे. त्याच्या पुढच्या स्टोरीमध्ये “मी नेहमीच भविष्याबद्दलचे अचूक अंदाज लावत असते. माझ्या या दूरदृष्टीला काहीजण एक्सरे व्हिजन म्हणतात, तर काही मला त्याचा श्राप म्हणून उल्लेख करतात. बरेचसे लोक याला जादूटोण्याचे स्वरुप देखील देतात. अजून किती दिवस आपण स्त्रियांच्या अलौकिक बुद्धीमत्तेला नाकारणार आहोत, हे देवालाच माहीत असावं. मानववृत्तीचे निरीक्षण आणि त्याचा अर्थ लावून ही कला अवगत करणं शक्य आहे. यासाठी ज्याविषयाबद्दल अंदाज लावून भविष्यवाणी करायची आहे, त्याचा अभ्यास स्वत:ची आवडनिवड विसरावी लागते”, असे लिहिले आहे.

आणखी वाचा – जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात… प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

कालच्या दिवसामध्ये कंगनाच्या असंख्य चाहत्यांनी तिचे सस्पेंड केलेले अकाऊंट पुन्हा सुरु करावे अशी मागणी एलॉन मस्ककडे केली आहे. यावरुन कंगना रणौत ट्विटरवर कमबॅक करु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.