कंगना रणौत ही बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त क्वीन म्हणून ओळखली जाते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर स्वतःची मतं मांडताना दिसते. कंगना तिच्या चित्रपटांइतकीच तिच्या वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. कंगना रणौत ‘चंद्रमुखी २’ मुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूकनंतर आता ‘चंद्रमुखी २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे.

कंगना नेहमीच तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकते. ‘चंद्रमुखी २’ मधील तिचा फर्स्ट लूक ५ ऑगस्टलाच प्रदर्शित झाला होता. कंगनाचा चंद्रमुखी लूक लोकांना खूप आवडला. ‘चंद्रमुखी २’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कंगना या चित्रपटात तिच्या नेहमीच्या धाटणीपेक्षा काहीतरी वेगळ्या अवतारात आणि लूकमध्ये दिसत आहे.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

आणखी वाचा : “तुझ्या वडिलांनी तुझ्या शरीराचा…” महेश भट्ट यांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला पूजा भट्टचं चोख उत्तर

या ट्रेलरमध्ये कंगना मुख्य भूमिकेत खूपच सुंदर दिसत आहे. वेट्टय्यान राजाच्या दरबारात नर्तकीची भूमिका तिने साकारली आहे, जी तिच्या सौंदर्य आणि नृत्य कौशल्यासाठी राजदरबारात प्रसिद्ध आहे. चंद्रमुखीच्या सौंदर्याची आणि नृत्याचे लाखो चाहते आहेत. ‘चंद्रमुखी २’ च्या ट्रेलरची सुरुवात एका मोठ्या संयुक्त कुटुंबासह होते जे एका हवेलीत समस्या सोडवण्याच्या उद्देशाने आलेले असते. दक्षिण दिशेला चंद्रमुखीचा वास असल्याने हवेलीच्या दक्षिणेकडे जाऊ नये म्हणून कुटुंबाला आधीच कळवले गेले आहे.

चंद्रमुखीच्या कथेला १७ वर्षांनी एक नवे वळण मिळाले आहे. एक राजा आणि त्याची दरबारी नृत्यांगना चंद्रमुखी यांची २०० वर्षे जुनी कहाणी सध्याच्या काळाशी जोडलेली आहे. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात राधिका सरथकुमार, वादिवेलू, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, रवी मारिया आणि सुरेश मेनन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader