स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) त्याच्या एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यामुळे वातावरण चांगलंच पेटलं. त्याच्या या गाण्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि चांगलेच नेते संतापले. त्यामुळे त्यांनी त्यांनी निषेध म्हणून कुणाल कामराचा शो झाला, त्या हॉटेलमध्ये घुसून सेटची तोडफोड केली.
या प्रकरणामुळे सोमवारी राज्यातलं वातावरण तापलेलं होतं, विधानसभेतही याचे पडसाद उमटले असून अनेकांनी कुणाला कामराला खडे बोल सुनावले. अशातच आता अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला तिने आपली प्रतिक्रिया दिली. याबद्दल तिने असं म्हटलं की, “तुम्ही कुणीही असा… तुम्ही एखाद्याशी सहमत असाल किंवा नसाल. पण त्याने (कुणाल कामरा) ज्याप्रकारे माझी टिंगळ उडवली होती. माझ्याबरोबर जे काही अनधिकृतपणे झालं होतं. त्याची मस्करी त्याने केली होती. मी माझ्या घटनेचा आणि या घटनेचा संबंध जोडत नाही. तुम्ही कुणीही असाल. पण कुणाचा अपमान करणं हे योग्य नाही.”
यापुढे अभिनेत्रीने कुणालच्या गाण्याचा निषेध करत म्हटलं की, “एखाद्या व्यक्तीसाठी आदरच सर्वस्व असतो. तुम्ही विनोदाच्या नावाखाली अपमान करत आहात. त्यांच्या कामाचा अपमान करत आहेत. शिंदेजी एकेकाळी रिक्षा चालवत होते. आज ते स्वतःच्या हिंमतीने पुढे आले आहेत. स्वतःची काय पात्रता आहे? हे लोक कोण आहेत? जे आयुष्यात काहीच करू शकले नाहीत. ते जर लिहित असतील तर त्यांनी साहित्यात काहीतरी लिखाण करावं किंवा चित्रपटांसाठी विनोदी लिखाण करावं.”
यापुढे कंगणाने असं म्हटलं की, “कॉमेडीच्या नावाखाली शिवीगाळ करणं, आपल्या धर्मग्रंथांची खिल्ली उडवणं, लोकांची खिल्ली उडवणं, माता-भगिनींची खिल्ली उडवणं हे आजकाल हे लोक स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणत आहेत. तर मला विचारायचं आहे की, आपला समाज कुठे चाललाय? फक्त २ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी हे असं करत आहेत. तर आपला समाज कुठे चालला आहे? आपण याचा विचार करायला हवा. फडणवीसजींनी ज्याप्रकारे म्हटलं की, आपण जे काही बोलतो त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्याशी मी सहमत आहे.”
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर कुणालने त्याच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत “अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कुणालाही घाबर नाही. मी लपून बसलेलो नाही” असं म्हटलं आहे.