Udaipur Murder Case : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजसथामधील उदयपूर येथे हत्या करण्यात आली. या हत्येचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून हल्लेखोरांनी शिवणकाम व्यावसायिकाच्या दुकानात घुसून त्याच्यावर चाकू आणि तलवारीने वार केले आहेत. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने देखील या प्रकरणात संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने शिवणकाम करणाऱ्या कन्हैयालालचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत कंगना म्हणाली, “नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्यामुळे या निर्घृण हत्या करण्यात आली आणि जिहादींनी हा व्हिडीओ केला. ते लोक दुकानात जाणीवपूर्वक घुसले. त्यानंतर मोठमोठ्या घोषणा देऊ लागले. हे सगळं देवाच्या नावावर सुरु होतं.”
आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
पाहा पोस्ट
आणखी वाचा : पापाराझींना कसं कळतं की सेलिब्रिटी कधी आणि कुठे असणार आहेत? मजेशीर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने दिले उत्तर
पाहा पोस्ट
आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट
पुढे कंगनाने आणखी एक स्टोरी शेअर केली आहे. यात कंगनाने त्या दोन व्यक्तींचा फोटो शेअर केला आहे. ज्यांनी कन्हैयालालची हत्या केली.
पाहा व्हिडीओ –
हा फोटो शेअर करत कंगना म्हणाली, “देवाच्या नावावर त्यांनी कन्हैयालालची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर फोटोसाठी अशी पोज दिली. त्यांनी बरेच व्हिडीओ शूट केले. या घटनेने मला हादरवून टाकलं आहे. ते व्हिडिओ पाहण्याची माझ्यात हिंम्मत नाही.” कंगनाने शेअर केलेल्या या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या असून नेटकरी यावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.