# metoo या मोहिमेच्या माध्यमातून अनेक अभिनेत्यांची पोलखोल होत असून अभिनेत्री कंगना रणौतनेही दिग्दर्शक विकास बहलवर आरोप केले आहेत. कंगनाचे आरोप ऐकल्यानंतर विकासची पत्नी ऋचा दुबेने कंगनावर जोरदार हल्ला चढविला होता. तेव्हापासून या दोघींमध्ये शीतयुद्ध सुरु झालं आहे. आता कंगनानेही ऋचाला प्रत्युत्तर दिलं आहे.

माझा पती इतका वाईट आहे तर मग तितकी वर्षे तू त्याच्याशी मैत्री का ठेवलीस? असा प्रश्न ऋचाने कंगनाला विचारला आहे. या प्रश्नावर कंगनाने तिच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.

‘विकासवर गैरवर्तणुकीचा आरोप केल्यानंतर ऋचा आज त्याच्या मदतीला आली आहे. जर खरंच तुला विकासवर एवढा विश्वास होता तर मग त्याच्यापासून विभक्त का झालीस ? आता आम्ही सामंजस्याने विभक्त झालो आहोत, अशी उत्तर देऊ नकोस’, असं कंगना म्हणाली.

दरम्यान, ऋचा दुबे आणि विकास बहल यांनी काही वर्षापूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. एका महिला क्रू मेंबरने दिग्दर्शक विकास बहलवर गैरतर्वनाचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतही या महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. त्यामुळेच ऋचा दुबेने आपल्या पतीची बाजू सावरत कंगनावर जोरदार हल्ला चढवला आहे.

Story img Loader