बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तरी अनेक मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त करत असते. गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिनानिमित्त भाषण केले होते, त्यावर अभिनेते प्रकाश राज यांनी टीका केली होती. यावर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाहांचं हिंदी दिनानिमित्त भाषण
हिंदी दिनानिमित्त अमित शाह यांनी हिंदीचे महत्त्व सांगितले होते. “जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील भाषांच्या विविधतेला जोडणाऱ्या भाषेचं नाव हिंदी आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंत हिंदीने देशाला जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,” असं ते म्हणाले होते. त्यांचं हे भाषण एएनआयने शाह एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केले होते.
प्रकाश राज यांची टीका
अमित शाहांचा व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिलं, “तुम्ही हिंदी बोलता कारण तुम्हाला हिंदी येते… तुम्ही आम्हाला हिंदी बोलण्यास सांगता कारण तुम्हाला… फक्त… हिंदी येते.” यासोबतच प्रकाश राज यांनी स्टॉप हिंदी डे हा हॅशटॅगही वापरला होता.
प्रकाश राज यांना कंगनाचं उत्तर
प्रकाश राज यांना उत्तर देताना कंगना म्हणाली, “अमित शाह गुजरातचे आहेत, त्यांची मातृभाषा गुजराती आहे.”
दरम्यान, प्रकाश राज यांनी हिंदीवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बऱ्याचदा त्यांनी हिंदीला विरोध केला आहे.