कलासृष्टीमधील प्रत्येक वादग्रस्त मुद्द्यावर कंगना रणौत आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे तिला ट्रोल देखील करण्यात येतं. मात्र या सगळ्याकडे ती दुर्लक्ष करतानाच दिसते. बॉलिवूडमधील घराणेशाही, मानधनावरून निर्माण होणारे वाद या सगळ्या विषयांवर यापूर्वीही कंगनाने आपलं मत मांडलं आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण आपल्या चित्रपटाचं बॉलिवूडकरांना कौतुक नाही म्हणत तिने आता अक्षय कुमार आणि अजय देवगणवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली कंगना रणौत?
सलमान खानने कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताच ती चर्चेत आली होती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान कंगनाने बॉलिवूडकरांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. बॉलिवूडच्या सध्याच्या परिस्थितीबाबत तिला विचारलं असता कंगना म्हणाली, “अजय देवगण दुसऱ्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करेल पण माझ्या चित्रपटांचे प्रमोशन कधीच करणार नाही. अक्षय कुमारने देखील मला फोन केला आणि तुझा ‘थलायवा’ चित्रपटाचा ट्रेलर मला आवडला असं दबक्या आवाजात सांगितलं. पण माझ्या चित्रपटाचा ट्रेलर कधीच तो ट्विट करणार नाही.” अजय-अक्षय आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत नसल्याचं यावेळी कंगनाने बोलून दाखवलं.

आणखी वाचा – अक्षय कुमारला पुन्हा एकदा करोनाची लागण, अभिनेता म्हणतो, “म्हणूनच मी आता…”

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय बोलली कंगना रणौत?
तुझ्या चित्रपटाबाबत असं कोणी का करेल असं कंगनाला विचारलं असता ती म्हणाली, “तुम्हाला हा प्रश्न मला नव्हे तर त्यांनाच विचारायला हवा. मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील माझ्या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट केला आणि त्यानंतर ते ट्विट डिलीट केलं. त्यांनी असं का केलं हे तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे.”

आणखी वाचा – ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी मानधन? बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांनाही टाकलं मागे

कंगनाने आता नव्या वादाला सुरुवात केली आहे. इतर कलाकारांना मी जसा पाठिंबा देते तसंच बाकीच्या कलाकारांनी मला पाठिंबा दिला पाहिजे असं कंगनाचं म्हणणं आहे. शिवाय ‘शेरशाह’, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचं देखील कंगनाने कौतुक केलं होतं. तर इतर कलाकारांनी देखील माझ्या चित्रपटांचं कौतुक केलं पाहिजे असं कंगनाला वाटतं. आता इतर कलाकार कंगनाला या तिच्या वक्तव्यावर काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut says ajay devgn will never promote her film claims akshay kumar called her quietly to praise thalaivi kmd