बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chadda) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा ट्रेंड चर्चेत असल्याने स्वतः आमिरनेच यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. आता कंगना रणौतने (Kangana Ranaut) या वादात सहभाग घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Koffee With Karan 7 : “मुलं झाल्यानंतर सेक्स लाइफ बदलतं का?” करीना-आमिरचं उत्तर ऐकून करण जोहरची बोलती बंद

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ यामागे आमिरच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. “आगामी हिंदी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’बाबत सध्या नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. पण यामागचा मास्टरमाइंड खुद्द आमिर खानच आहे. फक्त एक हिंदी विनोदी चित्रपट सोडला तर यावर्षी एकही हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. भारतीय संस्कृतीशी जोडले गेलेल दाक्षिणात्य चित्रपटच उत्तम कामगिरी करत आहेत.” असं कंगना आपल्या पोस्टद्वारे स्पष्टपणे म्हणाली.

पुढे कंगना म्हणाली, “हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला हिंदी चित्रपट यशस्वी कामगिरी करत नाही. प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं हे सर्वप्रथम हिंदी चित्रपटसृष्टीने समजून घेतलं पाहिजे. इथे हिंदू किंवा मुस्लिम असा काही संबंध येत नाही. आमिरने ‘पीके’ सारखा चित्रपट केला आणि आता देश असहिष्णु आहे असं त्याने म्हटलं. आमिर तू तुझ्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. पण चित्रपटांना एखादा धर्म किंवा त्याच्या विचारधारांशी जोडणं बंद कर.”

आणखी वाचा – “रात्री तीन वाजता फोन करून…” मल्लिका शेरावतचं सिनेसृष्टीबाबत धक्कादायक वक्तव्य

चित्रपटाबाबत होणारी नकारात्मक चर्चा ही आमिरमुळे आहे असं कंगनाचं स्पष्ट मत आहे. आता आमिर यावर प्रतिक्रिया देणार का? हे पाहावं लागेल. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ बद्दल बोलायचं तर, हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ हॉलीवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut share post about aamir khan lal singh chaddha movie says film boycott curated by actor kmd