कन्नड चित्रपट ‘कांतारा’ची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. आधी कन्नड आणि नंतर हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. तब्बल १७० कोटीहून अधिक कमाई करणारा हा तिसरा कन्नड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे कर्नाटक सरकारनेही ‘दैव नर्तकांना’ विशेष भत्ता देण्याचं जाहीर केलं आहे. दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टीचंही खूप कौतूक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही या चित्रपटाचं कौतूक केलं आहे. तिने चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टीचं कौतूक करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. कंगना व्हिडिओमध्ये म्हणाली, “मी नुकताच कांतारा हा चित्रपट कुटुंबाबरोबर बघून बाहेर आले आहे. रिषभ शेट्टी यांचं लिखाण, दिग्दर्शन, अभिनय सगळंच अविस्मरणीय आहे. हॅट्स ऑफ.

आणखी वाचा : ‘कांतारा’च्या यशानंतर कर्नाटक सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; ‘दैव नर्तकांसाठी’ केली मोठी घोषणा

चित्रपटातील साहसदृश्यं आणि त्यातील लोककलेबद्दलही कंगनाने तीचं मत दिलं कंगना म्हणाली, “परंपरा आणि लोककला यांचा अनोखा मेळ मला या सिनेमातून अनुभवता आला. यालाच खरा चित्रपट म्हणतात.” शिवाय इतर प्रेक्षकांप्रमाणे कंगनाही हा चित्रपट पाहून भारावून गेली. पुढे ती म्हणाली, “मी खूप लोकांकडून ऐकलं की त्यांनी आजवर असं काही चित्रपटात अनुभवलं नव्हतं. हा चित्रपट देण्यासाठी मेकर्सचे मनापासून आभार. किमान पुडच्या आठवड्यापर्यंत या चित्रपटाचा प्रभाव माझ्यावर कायम राहील.”

या चित्रपटाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजूनतरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ३० सप्टेंबरला प्रदर्शित होऊन अजूनही चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणणारा ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटविश्वातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut shares her experience of watching kannada film kantara with family avn
Show comments