बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. पण नुकतंच कंगना रणौतने आलिया भट्टवर टीका केली आहे. कंगना रणौतने बहिण रंगोलीची एक पोस्ट शेअर करत आलियावर निशाणा साधला आहे.
कंगना रणौतची बहिण रंगोली हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर महिलांवर केंद्रीत असलेल्या हिट ठरलेल्या चित्रपटांची यादी शेअर केली आहे. या यादीत ज्या चित्रपटांनी एका दिवसात १० कोटींची कमाई केली, अशा चित्रपटांचा समावेश होतो. या यादीत कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. तर आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे.
रंगोलीने शेअर केलेल्या पोस्टनुसार, कंगनाची प्रमुख भूमिका असलेला मणिकर्णिका या चित्रपटाने १८.१ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे तो अव्वल स्थानावर आहे. तर तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी १६.१ कोटींची गल्ला जमवला होता. तर मणिकर्णिका चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाची कमाई १५.७ कोटी अशी आहे. त्यानंतर या यादीत आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा समावेश होतो.
ही यादी शेअर करताना रंगोलीने आलियाचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. “पप्पा खूप काही खरेदी करू शकतात, पण काही मौल्यवान वस्तू आपल्याला स्वतः कमावाव्या लागतात.” असे रंगोलीने म्हटले आहे. दरम्यान रंगोलीची ही यादी कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यावेळी कंगनाने मी सहमत आहे, रंगोली, असे म्हटले आहे.
रणवीर सिंहच्या चाहत्याने चक्क पाठीवर काढला टॅटू, अभिनेत्याच्या ‘या’ कृतीने वेधले सर्वांचेचं लक्ष
आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानेच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.