बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे. ‘टिकू वेड्स शेरू’मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अवनीत कौर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “संजय लीला भन्साळींची कॉपी केली” ‘रॉकी और रानी…’च्या टीझरमुळे करण जोहर ट्रोल; नेटकरी म्हणाले “नक्की काय दाखवायचंय…?”

कंगनाने ‘टिकू वेड्स शेरू’चित्रपटात अवनीत कौरसारख्या नव्या अभिनेत्रीला कास्ट करुन तिला बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने अवनीतला तिच्या चित्रपटात संधी देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. कंगना म्हणाली की, “अवनीत खरोखरच खूप हुशार आणि मेहनती मुलगी आहे. मी बाहेरच्या लोकांना चित्रपटसृष्टीत आणण्यावर भर देत आहे. म्हणूनच मी अवनीत सारख्या नवोदित कलाकारांना लॉन्च करीत आहे. एक निर्माती म्हणून मी केव्हाच पैसा, भांडवलाचा विचार नाही केला. या बॉलीवूडमध्ये खरं टॅलेंट येण्याची गरज आहे.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’च्या ट्रोलर्सला क्रिती सेनॉनने दिले सडेतोड उत्तर; पोस्ट शेअर करीत म्हणाली, “माझे लक्ष फक्त टाळ्यांचा आवाज अन्…”

कंगना पुढे म्हणाली, “मला भविष्यात सुद्धा अवनीतबरोबर काम करायला नक्कीच आवडेल, परंतु माझी अशी अजिबात इच्छा नाही ती आम्ही कोणताही करार करावा. कागदावर करार करून मी कोणाचे आयुष्य कंट्रोल करू शकत नाही. अवनीतला माझ्याकडून नेहमीच खूप प्रेम आणि आशीर्वाद आहेत. मी भविष्यात कोणालाही लॉन्च केले तरीही मी त्यांच्या आयुष्यावर आणि करिअरवर कधीही नियंत्रण ठेवणार नाही किंवा तसा प्रयत्नही करणार नाही.”

हेही वाचा : “तुम क्या मिले…” रणवीर-आलियाचा रोमँटिक अंदाज, बहुचर्चित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘टिकू वेड्स शेरू’या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर अवनीत कौर मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २३ जून रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. दुसरीकडे कंगना रणौत ‘इमर्जन्सी’ आणि ‘तेजस’ सारख्या बहुचर्चित चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut talks about cast avneet kaur with nawazuddin siddiqui in tiku weds sheru sva 00