‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेत्री मीनाकुमारी यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना राणावत साकारणार आहे. मीनाकुमारी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात कंगना ‘ट्रॅजेडी क्वीन’ची भूमिका पडद्यावर रंगवणार अशा चर्चेला सुरुवात झाली होती. खुद्द कंगनानेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, सध्या एकापाठोपाठ एक चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने मीनाकुमारी यांच्या चित्रपटाला पुढच्या वर्षीच सुरुवात होईल, असे कं गनाने स्पष्ट केले आहे. ‘क्वीन’साठी मिळालेला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद आणि दुसरीकडे तिच्या कारकीर्दीसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या ‘तनु वेड्स मनु’ या आनंद एल. राय दिग्दर्शित चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम अशा दुहेरी आनंदात असलेल्या कंगनाने मीनाकु मारी यांच्यावरच्या चित्रपटात त्यांची भूमिका करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे सांगितले. सध्या आकंठ कामात बुडालेल्या कंगनाने या चित्रपटाबाबतीत सगळ्या गोष्टी जुळून येतील, अशी आशा असल्याचे सांगितले.

Story img Loader