अभिनेत्री कंगना रणौत आणि ट्रोलर्सचं जुन नातं आहे. कंगनाला सोशल मीडियावर कायमच वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल केलं जातं. तर अनेकदा या ट्रोल करणाऱ्यांना ती सडेतोड उत्तरही देत असते. नुकतच कंगनाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी कंगना फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कंगनाच्या एका चुकीमुळे तिला ट्रोल केलं जातंय.
कंगनाला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगनाचा व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने पांढऱ्या रंगाचा सलवार सूट परिधान केल्याचं दिसतंय. मात्र यावेळी कंगनाने मास्क न घातल्याचं दिसतंय. यामुळेच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. एअरपोर्टवरील एका बोर्डवर ‘नो मास्क नो एण्ट्री’ म्हणजेच विना मास्क प्रवेश नाही असं स्पष्ट लिहिलेलं असतानाही कंगनाने या बोर्डाकडे दूर्लक्ष करत विना मास्क विमानतळावर प्रवेश केल्याचं दिसंतय. कंगनाच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
“जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार?”; बिग बॉसमध्ये स्नेहा आणि अविष्कारमध्ये वादाची ठिणगी
देसी गर्लचा देसी अंदाज व्हायरल; प्रायव्हेट जेटमध्ये चक्क मांडी घालून बसली प्रियांका चोप्रा
या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “नो मास्क नो एण्ट्री एक फक्त सामान्यांसाठी आहे अशा सेलेब्ससाठी नाही”. तर दुसरा युजर म्हणाला, “ही कुणी महाराणी आहे का? मास्क न घालायला. लोक हिला आदर्श मानतात.” तर आणखी एक युजर म्हणाला, “व्वा नो मास्क नो एण्ट्रकडे काय दूर्लक्ष केलंय. जसं वोट मिळाल्यानंतर पक्ष जनतेला करते”
कंगनाने मास्क न घातल्याने अनेकांनी तिला ट्रोल केलंय. तसचं कंगना या व्हिडीओत विक्टरीची पोज देताना दिसून येत आहे. यावरुनही अनेकांनी प्र्शन उपस्थित केले आहेत. “ही काय आल्मिपिक जिंकून आली आहे का?” असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, कंगनाचा ‘थलायवी’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. तर येत्या काळात कंगाना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या सिनेमांमधऊन हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.