बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. नुकतच कंगनाला तिच्या बोल्ड लूकमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रालेट आणि स्विमिंग सूट परिधान केलेल फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता.

मात्र बोल्ड कपडे परिधान करण्याची कंगनाची ही पहिलीच वेळ नव्हे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कंगनाने अनेक बोल्ड भूमिका साकारल्या आहेत, तसचं अनेक इव्हेंटला कंगना बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. यावर कंगनाने काही मुलाखतींमध्ये खुलासादेखील केला होता.
कंगनाने अनेक बोल्ड फोटो शूट केले आहेत. या फोटोशूटसाठी विचित्र कपडे देण्यात आले होते असं कंगना म्हणाली होती. एवढचं नव्हे तर एका मुलाखतीत कंगनाने ती एका अडल्ट सिनेमासाठी देखील तयार होती असा खुलासा केला होता. जर कंगनाला गँगस्टर सिनेमा मिळाला नसता तर आज ती अडल्ट सिनेमा करत असती असं कंगना म्हणाली होती.

या मुलाखतीत कंगना म्हणाली, ” मला गँगस्टर सिनेमा मिळण्याआधी एक अडल्ट सिनेमाची ऑफर मिळाली होती. हा सिनेमा खालच्या दर्जाचा होता. हा सिनेमा चांगला नाही हे मला ठाऊक होतं तरी मी तो सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमाच्या फोटोशूटसाठी मला अत्यंत विचित्र कपडे देणायत आले होते. जे अडल्ट सिनेमासारखे वाटत होते” असं कंगना म्हणाली. मात्र याचवेळी तिला गँगस्टर सिनेमाची ऑफर आल्याने कंगनाने गँगस्टरची ऑफर स्विकारत त्या अडल्ट सिनेमाला नकार दिल्याचं मुलाखतीत सांगितलं. यावेळी ती केवळ १७-१८ वर्षांची होती असा खुलास देखील कंगनाने केला होता.

नुकतच कंगना बुडापेस्टमधून तिच्या ‘धाकड’ या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण करून भारतामध्ये परतली आहे. एअरपोर्टवर कंगनाला स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी कंगनाने निळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. मात्र तरीही कंगनाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. भारतात परतताच पूर्ण कपडे परिधान केले असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधल तसंच यावेळी कंगनाने मास्क घातलं नसल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला.

Story img Loader