बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावत सध्या आपल्या ‘क्वीन’ या चित्रपटाच्या यशामुळे सुखावलेली आहे. याच चित्रपटात कंगणा भारतीय चुंबनाची खूप प्रशंसा करतांना दिसते. मात्र आता कंगनाने आपले चुंबनातले कौशल्य तिच्या आगामी ‘रिव्हॉलव्हर राणी’ या चित्रपटात दाखवले आहे. चित्रपटात कंगनाने तिचा सहकलाकार वीर दासचे अशा प्रकारे चुंबन केले, की त्याच्या ओठातून रक्त वाहू लागले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील एका दृश्यामध्ये कंगनाला अटक करून तिला तुरुंगात घेऊन जातात. त्याचवेळी, काहीतरी महत्वाचे काम आहे असे सांगून ती वीर दासला एका रुममध्ये ओढते आणि त्याचे चुंबन घेते. तिच्या याच चुंबनामुले वीर दासच्या ओठातून रक्त वाहू लागते. आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने अशा प्रकारे खतरनाक भूमिका कोणत्याही चित्रपटात न केल्याचे सांगितले जात आहे.
रिव्हॉलव्हर राणीमध्ये कंगनाने गँगस्टर मुलीची भूमिका केली आहे. यात ती दबंग आणि सनकी स्वभावाची दिसते. २५ एप्रिलला कंगनाचा दबंग अवतार आपल्याला चित्रपटगृहात पाहावयास मिळेल.

Story img Loader