कंगना राणावतचा ‘क्वीन’ हा चित्रपट आता एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. कंगनाच्या ‘क्वीन’ला बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले होते. या चित्रपटाच्या यशामुळे अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. दुसऱ्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ११ कोटींचा व्यवसाय केल्यानंतर कंगनाचा ‘क्वीन’ आता तीन भाषांमध्ये बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तामीळ, तेलगू आणि चिनी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. यापूर्वी अनेकदा ग्लॅमरस भूमिकांमध्ये दिसणारी कंगना ‘क्वीन’च्या माध्यमातून एका नॉन ग्लॅमरस भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांनीसुद्धा उचलून धरले. तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीसुद्धा ‘क्वीन’मधील भूमिकेसाठी कंगनाचे कौतूक केल्याने या सिनेमाची माऊथ पब्लिसिटी चांगल्याप्रकारे झाली होती.  

Story img Loader