अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या विधानांसाठी नेहमी चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा सुरु झाल्यापासून ती अनेकांच्या विरोधात बोलली आहे. आता कंगनाने महेश भट्ट यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचं खरं नाव महेश नसून अस्लम असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. महेश भट्ट आपले सुंदर नाव का लपवत आहेत?, असा सवाल कंगनाने विचारला. तसेच महेश भट्ट यांनी आपले खरे नाव वापरावे. त्यांनी स्वतः धर्मांतर केले असल्याने त्यांनी एका विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्व करू नये, असा सल्लाही कंगनाने त्यांना दिला.

आणखी वाचा : नावातून ‘खान’ आडनाव वगळण्याच्या माझ्या निर्णयाला मुलाने केला विरोध, सीमा सजदेहचा खुलासा

नुकताच कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर महेश भट्ट यांचा काही वर्षांपूर्वी चर्चेत राहिलेला एक व्हिडिओ शेअर केला. या क्लिप्स शेअर कारताना तिने महेश भट्ट यांचे खरे नाव आणि धर्म याबद्दलही काही विधाने लिहिली आहेत. महेश भट्ट यांच्या जुन्या भाषणातील एक क्लिप शेअर करताना कंगना रणौतने लिहिले की, “महेशजी सहजपणे आणि काव्यात्मकदृष्ट्या लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करत आहेत.”

याच व्हिडिओची आणखी एक क्लिप शेअर करत तिने लिहिले की, “मला सांगण्यात आले आहे की, त्यांचे खरे नाव महेश भट्ट नसून अस्लम आहे. त्यांनी आपली दुसरी पत्नी, सोनी राझदानशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केले. अस्लम हे एक सुंदर नाव आहे, ते लपवायचे कशाला?” कंगनाने आणखी एक क्लिप शेअर केली. ही क्लिप शेअर करत तिने लिहिले, “महेश यांनी आपले खरे नाव वापरावे. जेव्हा त्यांनी स्वतः धर्मांतर केले आहे तेव्हा विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्व करू नये.”

हेही वाचा : धाकड गर्ल ‘कंगना’ आता फिल्मफेअर सोहळ्याच्या विरोधात? कोर्टात करणार केस

महेश यांची मुलगी, पूजा भट्ट हिने दिग्दर्शित केलेल्या ‘धोखा’ चित्रपटाला कंगनाने नकार दिल्यावर महेश यांनी कंगनावर जवळजवळ हल्ला केल्याचा आरोप कंगनाने केला होता. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला कंगनाने आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महेश भट्ट आणि त्यांची मुलगी अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली होती. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत “या चित्रपटाची सर्वात मोठी चूक म्हणजे ‘चुकीचे कास्टिंग'” असे लिहिले होते. तिने आलियाला अप्रत्यक्षपणे ‘डॅडीज एंजल’ आणि महेश भट्ट यांना ‘मूव्ही माफिया’ म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंगनाने चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे.

Story img Loader