प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरची पाचव्यांदा करोना चाचणी करण्यात आली आणि पाचव्यांदाही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी करण्यात येते. याआधी चार वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कनिकावर उपचार सुरू आहेत. या इन्स्टिट्यूचे संचालक प्रा. आर. के. धिमन यांनी कनिकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. सोमवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित कनिकाने तिचा पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे अशी प्रार्थना केली होती. ‘मी आयसीयूमध्ये नाही. माझी तब्येत ठीक आहे. पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह येवो अशी अपेक्षा करते. माझ्या मुलांची आणि कुटुंबीयांची खूप आठवण येत आहे’, असं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं.

कनिकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. करोनाची लागण झाल्यानंतरही ती डिनर पार्टीला गेली होती. तिच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५० ते ३०० लोकांचा नंतर शोध घेण्यात आला होता. सुदैवाने त्यापैकी कोणाला अद्याप करोनाची लागण झालेली नाही.

Story img Loader