दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या ‘खतरों के खिलाडी’च्या १२ व्या पर्वाच्या शूटिंगला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन सुरु झाली आहे. या पर्वात अभिनेत्री कनिका मान देखील सहभागी झाली आहे. कनिका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण स्विमसूटमधील फोटो शेअर करण्यासाठी वडिलांना ब्लॉक केल्याचं कनिकाने सांगितलं.

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कनिकाने या विषयी सांगितले. “मी माझ्या बहिणीला ब्लॉक केलं नव्हतं. तिला माझे इन्स्टाग्रामवरील फोटो दिसत होते आणि तेव्हा वडिलांनी तिला विचारलं की मला कनिकाचे फोटो का दिसत नाहीत? माझ्या बहिणीने त्यांना कसंबसं समजावलं की ती फारसे फोटो अपलोड करत नाहीये. तरीसुद्धा ते तिला विचारत होते की त्यांना माझ्या अकाऊंटवरील फोटो का दिसत नव्हते. त्यांना इन्स्टाग्रामच्या फिचर्सबद्दल फारशी माहिती नाही. आता शो काही दिवसांत ऑन एअर जाईल. तेव्हा मी त्यांचा सामना कसा करेन हे मलाच माहित नाही.”

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

आणखी वाचा : अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? सुमीत राघवननं एकनाथ शिंदेंना केला प्रश्न

यंदाच्या खतरो के खिलाडीच्या शोमध्ये कनिकासोबतच रुबिना दिलैक, फैजल शेख, जन्नत झुबैर, मोहित मलिक, चेतना पांडे, निशांत भट, प्रतिक सेहजपाल, सुरभी झा आणि शिवांगी जोशी यांनीसुद्धा भाग घेतला आहे.

Story img Loader