कन्नड अभिनेत्री रचिता राम ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत रचिता एका पत्रकाराच्या प्रश्नवार संतापली. खरं तर डिंपल क्लीन म्हणून ओळखली जाते. रचिताने संतापून एका पत्रकाराला विचारलं की लग्नाच्या पहिल्या रात्री काय केलं?
सुरुवातील पत्रकाराने रचिताला चित्रपटाच्या इंटिमेट सीनविषय प्रश्न विचारला होता. कारण रचिताने या आधी असे सीन कधीच दिले नव्हते. ‘लव्ह यू रच्चू ‘ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, जेव्हा रचिताला तिच्या या इंटिमेट सीन देण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारला. तेव्हा रचिता म्हणाली, स्क्रिप्टमध्ये जे होतं ते तिने केले. ‘लव यू रच्चू’ मधले रचिता आणि अजय रावचे बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर यावरच प्रश्न विचारल्यानंतर रचिताला राग आला.
आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती
रचिता रागात म्हणाली, “इथे बरेच लोक विवाहित आहेत. कुणालाही लाजवण्याचा माझा हेतू नाही. मी तुम्हांला सर्वसाधारणपणे विचारतेय… मला सांगा लग्नानंतरच्या पहिल्या रात्री लोक काय करतात? लग्नाच्या रात्री तुम्ही काय केले?” रचिताचा हा प्रश्न ऐकल्यानंतर परिषदेत असलेले पत्रकार थक्कच झाले.
पुढे रचिता म्हणाली, “ते रोमान्स करतात ना? चित्रपटातही तेच दाखवण्यात आलं आहे.” बोल्ड सीन करण्याबाबत रचिताने आधीच स्पष्टीकरण दिले होते की, जर मी ते सीन केले असतील तर त्यामागे कारण आहे. हे चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.